हा या वर्षातील २१३ वा (लीप वर्षातील २१४ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००१ : सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. ३ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाचे औपचारिक उद्‍घाटन झाले.
१९९६ : कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते व निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
१९९४ : भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली. जगातील अशा तर्‍हेची ही पहिलीच योजना आहे.
१९६० : इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.
१९४४ : पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.
१९१४ : पहिले महायुद्ध – जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
१८७६ : कोलोरॅडॊ अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.
१७७४ : जोसेफ प्रिस्टले व कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६९ : ग्रॅहॅम थॉर्प – इंग्लिश क्रिकेटपटू
१९५५ : अरुणलाल – क्रिकेटपटू व समालोचक
१९५२ : यजुर्वेंद्र सिंग – क्रिकेटपटू
१९३२ : महजबीन बानो ऊर्फ ’मीनाकुमारी’ – अभिनेत्री (मृत्यू: ३१ मार्च १९७२)
१९२४ : सर फँक वॉरेल – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू (मृत्यू: १३ मार्च १९६७)
१९२० : ’लोकशाहीर’ अण्णाणाऊ साठे – लेखक, कवी व समाजसुधारक (मृत्यू: १८ जुलै १९६९)
१९१५ : श्री. ज. जोशी – कथाकार व कादंबरीकार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष (मृत्यू: ? ? ????)
१९१३ : भगवान आबाजी पालव ऊर्फ ’मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (मृत्यू: ४ फेब्रुवारी २००२)
१८९९ : कमला नेहरू – जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९३६)
१८८२ : पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्‍न (१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष (मृत्यू: १ जुलै १९६२)
१८७९ : अच्युत बळवंत (वामन) कोल्हटकर – अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखनशैलीचे प्रवर्तक, चतुरस्त्र लेखक, पत्रकार व नाटककार, चरित्रपर नाटके (स्वामी विवेकानंद, ताई तेलीण, मस्तानी, चांदबीबी) हा नवा प्रकार त्यांनी सुरु केला. ‘संदेश’ वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक
(मृत्यू: १५ जून १९३१)
१८३५ : महादेव मोरेश्वर कुंटे – कवी व संस्कृतचे प्राध्यापक. ’राजा शिवाजी’ हे त्यांचे काव्य विशेष गाजले. (मृत्यू: ८ आक्टोबर १८८८ - पुणे)
१७४४ : जीन बाप्टिस्टे लॅमार्क – फ्रेंच शास्त्रज्ञ (मृत्यू: १८ डिसेंबर १८२९)
ख्रिस्त पूर्व १० : क्लॉडियस – रोमन सम्राट (मृत्यू: ख्रिस्त पूर्व ५६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००८ : हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य (जन्म: २३ मार्च १९१६)
२००८ : अशोक मांकड – क्रिकेटपटू (जन्म: १२ आक्टोबर १९४६)
२००५ : फहाद – सौदी अरेबियाचा राजा (जन्म: १६ मार्च १९२१)
१९९९ : निराद सी. चौधरी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९७५) बंगाली/इंग्लिश लेखक. १९५१ मधे त्यांचे ’अ‍ॅन आटोबायोग्राफी ऑफ अ‍ॅन अननोन इंडियन’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्याच्या १४ आवृत्त्या निघाल्या. (जन्म: २३ नोव्हेंबर १८९७ - किशोरगंज, म्यामेनसिंग, बांगला देश)
१९२० : लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी, भगव्‌दगीतेचे भाष्यकार (जन्म: २३ जुलै १८५६ - रत्‍नागिरी)
११३७ : लुई (सहावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: १ डिसेंबर १०८१)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Saturday, 11 January, 2014 16:43