-: दिनविशेष :-

४ जुलै

अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन

संत मुक्ताबाई स्मृतीदिन


महत्त्वाच्या घटना:

१९९९

लष्कराच्या १८ व्या बटालियनने कारगिलमधील द्रास या उपविभागातील ‘टायगर हिल्स’ हा लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला. याबद्दल लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी १८ व्या युनिटला ‘युनिट सायटेशन’ हा विशेष सन्मान जाहीर केला.

१९९७

‘नासा’चे ‘पाथफाइंडर’ हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.

१९९५

टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचे (GMRT) संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार प्रदान

१९४७

ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारताचे ‘भारत’ व ‘पाकिस्तान’ असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.

१९४६

सुमारे ३८१ वर्षे परकीय सत्तांनी राज्य केल्यानंतर फिलीपाइन्सला (अमेरिकेपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९३६

‘अमरज्योती’ हा ‘प्रभात’चा चित्रपट मुंबईच्या ‘कृष्ण’ सिनेमात प्रदर्शित झाला.

१९११

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकांतवासास प्रारंभ

१८२६

अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या दिवशी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचे निधन झाले.

१७७६

अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासुन स्वतंत्र घोषित केले.

१०५४

वृषभ राशीत ‘क्रॅब नेब्यूला’ दिसत असल्याचे चिनी लोकांना समजले. नंतर जॉन बेव्हिसने इ. स. १७३१ मधे त्याचे निरीक्षण केल्याची नोंद आहे.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९२६

विनायक आदिनाथ तथा ‘वि. आ.’ बुवा – विनोदी साहित्यिक
(मृत्यू: १७ एप्रिल २०११)

१९१४

निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ‘पी. सावळाराम’ – भावगीतलेखक. कुसुमाग्रज यांनी त्यांना ‘जनकवी’ ही उपाधी दिली. १९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
(मृत्यू: २१ डिसेंबर १९९७)

१९१२

पं. निवृत्तीबुवा सरनाईक – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक
(मृत्यू: १६ फेब्रुवारी १९९४)

१८९८

गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते
(मृत्यू: १५ जानेवारी १९९८)

१८७२

काल्व्हिन कूलिज – अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: ५ जानेवारी १९३३)

१८०७

जुसेप्पे गॅरीबाल्डी – इटालियन सेनापती व राजकीय नेता
(मृत्यू: २ जून १८८२)

१७९०

भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट
(मृत्यू: १ डिमेंबर १८६६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९९

वसंत शिंदे – विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित
(जन्म: १४ मे १९०९)

१९८२

भरत व्यास – भक्तिप्रधान, पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपटांचे गीतकार
(जन्म: ? ? १९१८)

१९८०

रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार. ‘पाणकळा’, ‘सराई’, ‘पड रे पाण्या’, ‘आई आहे शेतात’, ‘गानलुब्धा’, ‘मृगनयना’ वगैरे त्यांच्या कादंबर्‍या अतिशय गाजल्या.
(जन्म: २४ एप्रिल १८९६)

१९६३

पिंगाली वेंकय्या – भारताच्या तिरंग्याचे रचनाकार
(जन्म: २ ऑगस्ट १८७६)

१९३४

मेरी क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: ७ नोव्हेंबर १८६७)

१९०२

स्वामी विवेकानंद – भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ‘रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली.
(जन्म: १२ जानेवारी १८६३)

१८३१

जेम्स मोन्‍रो – अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २८ एप्रिल १७५८)

१८२६

थॉमस जेफरसन – अमेरिकेचे ३ रे राष्ट्राध्यक्ष, २ रे उपाध्यक्ष आणि १ ले परराष्ट्रमंत्री. त्यांनी मांडलेल्या विचारांवर अमेरिकेची राज्यघटना आधारित असून तेथील लोकशाहीला ‘जेफरसनची लोकशाही’ असे म्हणतात.
(जन्म: १३ एप्रिल १७४३)

१८२६

जॉन अ‍ॅडॅम्स – अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष
(जन्म: ३० आक्टोबर १७३५)

१७२९

कान्होजी आंग्रे – सेना सरखेल
(जन्म: ? ऑगस्ट १६६९)


Pageviews

This page was last modified on 24 April 2021 at 11:06am