हा या वर्षातील ३५० वा (लीप वर्षातील ३५१ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९१ : पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.
१९८५ : कल्पक्‍कम येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर’ राष्ट्राला समर्पित
१९७१ : भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती
१९४६ : थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९३२ : ’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
१९०३ : मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.
१७७३ : अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी
१४९७ : वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९१७ : सर आर्थर सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक (मृत्यू: १९ मार्च २००८)
१८८२ : जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: २१ डिसेंबर १९६३)
१७७५ : जेन ऑस्टिन – इंग्लिश लेखिका (मृत्यू: १८ जुलै १८१७)
१७७० : लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचा जन्म. मी स्वर्गात नक्‍कीच संगीत ऐकू शकेन, हे त्याचे अखेरचे शब्द होते. (मृत्यू: २६ मार्च १८२७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००४ : लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (जन्म: ३ नोव्हेंबर १९५४)
२००० : सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवलेले सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी सर्कसमधे काम करण्यास सुरूवात केली होती. (जन्म: ? ? १८९९)
१९८० : कर्नल सँडर्स – ’केंटुकी फ्राईड चिकन’ (KFC) चे संस्थापक (जन्म: ९ सप्टेंबर १८९०)
१९६५ : डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार (जन्म: २५ जानेवारी १८७४)
१९६० : चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक
(जन्म: ४ फेब्रुवारी १८९३)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 16 January, 2014 15:17