-: दिनविशेष :-

११ मे

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन


महत्त्वाच्या घटना:

१९९९

टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील १,००० वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला.

१९९८

२४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.

१९४९

इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.

१८८८

मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी ‘महात्मा’ ही पदवी दिली.

१८६७

लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.

१८५८

मिनेसोटा अमेरिकेचे ३२ वे राज्य झाले.

१८५७

राष्ट्रीय उठाव – भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.

१८११

चँग आणि एंग (बंकर) या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा एका चिनी दांपत्याच्या पोटी जन्म.
(मृत्यू: १७ जानेवारी १८७४)

१५०२

ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६०

सदाशिव अमरापूरकर – अभिनेता

१९१८

रिचर्ड फाइनमन – क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक (१९६५) मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
(मृत्यू: १५ फेब्रुवारी १९८८)

१९१४

ज्योत्स्‍ना भोळे – संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्‍या गायिका आणि अभिनेत्री. संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७६), विष्णूदास भावे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, महाराष्ट्र विशेष गौरव पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार इ. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.
(मृत्यू: ५ ऑगस्ट २००१)

१९०४

साल्वादोर दाली – स्पॅनिश चित्रकार. विसाव्या शतकात पिकासोच्या खालोखाल प्रसिद्धी व लोकप्रियता मिळवलेले चित्रकार म्हणून ते ओळखले जातात.
(मृत्यू: २३ जानेवारी १९८९)

१८९५

जिद्दू कृष्णमूर्ती तथा जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ, वक्ते आणि लेखक
(मृत्यू: १७ फेब्रुवारी १९८६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००४

कृष्णदेव मुळगुंद – चित्रकार व नृत्यदिग्दर्शक
(जन्म: २७ मे १९१३)

१८८९

जॉन कॅडबरी – ब्रिटिश उद्योगपती व ‘कॅडबरी’ चे संस्थापक
(जन्म: १२ ऑगस्ट १८०१)

१८७१

सर जॉन विल्यम हर्षेल – ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक
(जन्म: ७ मार्च १७९२)


Pageviews

This page was last modified on 28 April 2021 at 6:50pm