-: दिनविशेष :-

२५ एप्रिल

जागतिक मलेरिया दिवसEnroll for Standard 10 : Online Class

महत्त्वाच्या घटना:

२०००

आलमट्टी धरण

वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत (सध्याची उंची ५०६ मीटर) वाढविण्यास सर्वोच्‍च न्यायालयाने परवानगी दिली. यामुळे २५ वर्षे चालू असलेला न्यायालयातील वाद संपुष्टात आला.

(Image Credit: विकिपीडिया)

१९८९

श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.

१९८३

पायोनिअर-१०

‘पायोनिअर-१०’ हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले.

(Image Credit: astronautix.com)

१९६६

एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.

१९५३

डी. एन. ए. रेणू

डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध ‘नेचर’ मासिकात प्रकाशित झाला.

(Image Credit: genome.gov)

१९०१

स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले.

१८५९

१९३.३ किमी लांबीच्या सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.


Enroll for Standard 10 : Online Class

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६१

करण राझदान

करण राझदान – अभिनेता, लेखक, दिग्दर्शक

(Image Credit: IMDb)

१९४०

अल पचिनो
व्हेनिस फिल्म फेस्टिवल (२००४)

अल्फ्रेड जेम्स तथा ‘अल’ पचिनो – हॉलिवूडमधील अभिनेता

(Image Credit: विकिपीडिया)

१९१८

शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते, संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. त्यांनी [जन्माने ख्रिश्चन असूनही] २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली
(मृत्यू: ११ मार्च १९९३)

१८७४

??

गुग्लिएल्मो मार्कोनी – रेडिओचा शोध लावणारे इटालियन संशोधक. भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९०९) विजेते.
(मृत्यू: २० जुलै १९३७)

(Image Credit: The Nobel Prize)

१२१४

लुई (नववा) – फ्रान्सचा राजा
(मृत्यू: २५ ऑगस्ट १२७०)


Enroll for Standard 10 : Online Class

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०२१

पं. राजन मिश्रा
भारत भवन, भोपाळ - २०१५

पं. राजन मिश्रा – ‘राजन-साजन’ मिश्रा या बनारस घराण्याच्या ख्याल गायक द्वयीतील राजन मिश्रा यांचे दिल्लीत कोविड-१९ मुळे निधन
(जन्म: ? ? १९५१)

(Image Credit: विकिपीडिया)

२००३

लिन चॅडविक – ब्रिटिश शिल्पकार, लोखंड, पोलाद, पितळ, प्लॅस्टर, काच आदी माध्यमांचा उपयोग करुन त्यांनी शिल्पे घडविली.
(जन्म: २४ नोव्हेंबर १९१४)

२००२

इंद्रा देवी – लाटव्हियाच्या योगशिक्षिका
(जन्म: १२ मे १८९९)

१९९९

समुद्र-समंध

पंढरीनाथ रेगे – साहित्यिक, बाल / कुमार कथा लेखक. मनमोहक गोष्टी, मनोहर कथा, इटुकल्यांसाठी रामायण, समुद्र-समंध, चातुर्याची झटापट, ५१ गमतीदार गोष्टी, कासवाची चतुराई, इंद्रधनुष्य, धनगराची मुलगी ही त्यांनी लिहिलेली काही पुस्तके आहेत.
(जन्म: ? ? ????)

१९६८

उस्ताद बडे गुलाम अली खाँ

उस्ताद बडे गुलाम अली खाँ ऊर्फ ‘सबरंग’ – पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक. पद्मभूषण (१९६२), संगीत नाटक अकादमी पारितोषिक (१९६२)
(२ एप्रिल १९०२)

(Image Credit: gaana.com)


Pageviews

This page was last modified on 25 April 2021 at 10:48pm