हा या वर्षातील २१० वा (लीप वर्षातील २११ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९७ : कलकत्त्याच्या वंगीय साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या साहित्यिक हरनाम घोष स्मृतीचिन्हासाठी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची निवड. अखिल भारतीय स्तरावरील हा पुरस्कार मराठी साहित्यिकास प्रथमच मिळाला.
१९८७ : भारताचे पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे. आर. जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या केल्या.
१९८५ : मल्याळम लेखक टी. एस. पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार
१९५७ : ’इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सी (IAEA)’ची स्थापना झाली.
१९४८ : दुसऱ्या महायुद्धामुळे पडलेल्या १२ वर्षांच्या खंडानंतर लंडन येथे १४ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९४६ : टाटा एअरलाइन्सचे ’एअर इंडिया’ असे नामकरण करण्यात आले.
१९२० : जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सानफ्रान्सिस्को या शहरांमधे सुरू झाली.
१८७६ : फादर आयगेन ला फॉन्ट आणि डॉ. महेन्द्र सरकार यांनी ’इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेची स्थापना केली.
१८५२ : पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबागवाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्‌गाते म्हणून जोतीबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८१ : फर्नांडो अलोन्सो – स्पॅनिश रेस कार ड्रायव्हर
१९५९ : संजय दत्त – अभिनेता व गुन्हेगार
१९५३ : अनुप जलोटा – भजनगायक
१९२५ : शि. द. फडणीस – व्यंगचित्रकार
१९२२ : ब. मो. पुरंदरे – इतिहासकार आणि लेखक, शिवशाहीर
१९०४ : जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे. आर. डी. टाटा’ – भारतरत्‍न, उद्योगपती व वैमानिक, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९९३)
१८८३ : बेनिटो मुसोलिनी – इटलीचा हुकूमशहा (मृत्यू: २८ एप्रिल १९४५)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००९ : महाराणी गायत्रीदेवी – जयपूरच्या राजमाता (जन्म: २३ मे १९१९)
२००६ : डॉ. निर्मलकुमार फडकुले –  मराठी संत साहित्यातील विद्वान (जन्म: १६ नोव्हेंबर १९२८)
२००३ : बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर’ – विनोदी अभिनेता (जन्म: ११ नोव्हेंबर १९२६)
२००२ : सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – गायक व संगीतकार (२५ जुलै १९१९)
१९९६ : अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्‍न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. (जन्म: १६ जुलै १९०९)
१८९१ : इश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक. यांच्या प्रयत्‍नांमुळेच १८५६ मधे विधवा विवाहाचा कायदा आला. (जन्म: २६ सप्टेंबर १८२०)
१८९० : व्हिन्सेंट व्हॅन गॉग – डच चित्रकार (जन्म: ३० मार्च १८५३)
१७८१ : योहान कीज – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (जन्म: १४ सप्टेंबर १७१३)
११०८ : फिलिप (पहिला) – फ्रान्सचा राजा (जन्म: २३ मे १०५२)
  २३८ : बाल्बिनस – रोमन सम्राट (जन्म: १६५)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Wednesday, 8 January, 2014 0:58