हा या वर्षातील ६२ वा (लीप वर्षातील ६३ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००५ : स्टीव्ह फॉसेट यांनी ’ग्लोबल फायर’ या मुलुखावेगळ्या विमानातून एकट्याने आणि पुन्हा इंधन न भरता ६७ तासात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
२००३ : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या 'शरच्‍चंद्र चटोपाध्याय' पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड
१९९४ : जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ’ग्रॅमी पुरस्कार’ प्रदान
१९७३ : ओरिसात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
१९६६ : डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू झाले.
१९४३ : दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार
१९३० : नाशिक येथील काळा राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.
१८८५ : अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.
१८६५ : हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.
१८४५ : फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले.
इ. स. ७८ : शालिवाहन शकास प्रारंभ

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७७ : अभिजीत कुंटे – भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर
१९७० : इंझमाम उल हक – पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९६७ : शंकर महादेवन – गायक व संगीतकार
१९५५ : जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते (मृत्यू: २५ आक्टोबर २०१२)
१९३९ : एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज (मृत्यू: ६ जुलै १९९९)
१९२६ : रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (मृत्यू: ७ मार्च २०१२)
१८४७ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश - अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक (मृत्यू: २ ऑगस्ट १९२२)
१८४५ : जी. कँटर – जर्मन गणितज्ञ (मृत्यू: ६ जानेवारी १९१८)
१८३९ : जमशेदजी नसरवानजी टाटा – आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक (मृत्यू: १९ मे १९०४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९५ : पं. निखिल घोष – तबलावादक (जन्म: ? ? १९१९)
१९८२ : रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (जन्म: २८ ऑगस्ट १८९६)
१९६५ : अमीरबाई कर्नाटकी – पार्श्वगायिका व अभिनेत्री (जन्म: ? ? १९०६)
१९१९ : हरी नारायण आपटे – कादंबरीकार (जन्म: ८ मार्च १८६४)
१७०७ : औरंगजेब – सहावा मोगल सम्राट (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८)
१७०३ : रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक (जन्म: १८ जुलै १६३५)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 6 March, 2014 18:37