-: दिनविशेष :-

७ जानेवारीEnroll for Standard 10 : Online Class

महत्त्वाच्या घटना:

१९७८

एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्‍यांसह होनोलुलूजवळील महासागरात बेपत्ता झाली.

१९७२

कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.

१९५९

क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.

१९३५

कोलकाता येथे ‘इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी’चे (INSA) उद्‌घाटन झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले.

१९२७

न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.

१९२२

पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.

१७८९

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची पहिली निवडणूक होऊन त्यान जॉर्ज वॉशिंग्टन विजयी झाले.

१६८०

मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.


Enroll for Standard 10 : Online Class

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७९

बिपाशा बासू – अभिनेत्री व मॉडेल

१९६७

इरफान खान
२०११ : पद्मश्री पुरस्कार

इरफान खान – भारतीय, ब्रिटिश तसेच अमेरिकन चित्रपटांत भूमिका साकारलेले अभिनेते, पद्मश्री (२०११) पुरस्काराने सन्मानित
(मृत्यू: २९ एप्रिल २०२०)

(Image Credit: विकिपीडिया)

१९६१

सुप्रिया पाठक – अभिनेत्री

१९४८

शोभा डे – विदुषी व लेखिका

१९२८

विजय तेंडुलकर – नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक
(मृत्यू: १९ मे २००८ - पुणे, महाराष्ट्र)

१९२५

‘प्रभात’ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या
(मृत्यू: ? ? ????)

१९२१

चंद्रकांत गोखले – अभिनेते
(मृत्यू: २० जून २००८)

१९२०

डॉ. सरोजिनी बाबर – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी
(मृत्यू: १९ एप्रिल २००८)

१८९३

जानकीदेवी बजाज – स्वातंत्र्य वीरांगना
(मृत्यू: २१ मे १९७९)


Enroll for Standard 10 : Online Class

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०००

डॉ. अच्युतराव आपटे – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्‍च शिक्षणाची व त्याद्वारे सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आयुष्य वेचलेले, विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक
(जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)

१९८९

मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट (जन्म: २९ एप्रिल १९०१)


Pageviews

This page was last modified on 29 April 2021 at 1:24pm