हा या वर्षातील १५६ वा (लीप वर्षातील १५७ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९४ : वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश कौटी क्रिकेट स्पर्धेत वॉरविकशायरकडून खेळताना नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
१९८० : नारायण मल्हार जोशीभारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
१९७७ : सेशेल्समधे उठाव झाला.
१९७५ : सुएझ कालवा पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९६७ पासून ८ वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती.
१९५९ : सिंगापूरमधील पहिल्या सरकारची स्थापना झाली.
१९१५ : डेन्मार्कमधे महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९०८ : रवि नारायण रेड्डी – ’कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ चे सहसंस्थापक (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९१)
१८८३ : जॉन मायनार्ड केन्स – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: २१ एप्रिल १९४६)
१८८१ : गोविंदराव टेंबेगोविंदराव टेंबे – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक. ’अयोध्येचा राजा’, ’अग्निकंकण’, ’मायामच्छिंद्र’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. हार्मोनियम या साथीच्या वाद्याला त्यांनी स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. (मृत्यू: ९ आक्टोबर १९५५)
१८७९ : नारायण मल्हार जोशी – भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक (मृत्यू: ३० मे १९५५)
१७२३ : अ‍ॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता (मृत्यू: १७ जुलै १७९०)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००४ : रोनाल्ड रेगन – अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ६ फेब्रुवारी १९११)
१९९९ : राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले (जन्म: ? ? ????)
१९७३ : माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक (जन्म: १९ फेब्रुवारी १९०६)
१९५० : हरिश्चंद्र बिराजदार – कुस्तीगीर व प्रशिक्षक (जन्म: १४ सप्टेंबर २०११)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 6 March, 2014 0:25