हा या वर्षातील २०९ वा (लीप वर्षातील २१० वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००१ : प्रसिद्ध आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
१९९९ : भारतीय धवलक्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांची प्रतिष्ठेच्या पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कारासाठी निवड
१९९८ : सर्वोच्‍च आणि उच्‍च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमुर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन
१९८४ : अमेरिकेतील लॉसएंजल्स येथे २३ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९७९ : भारताचे ५ वे पंतप्रधान म्हणून चौधरी चरणसिंग यांनी सूत्रे हाती घेतली.
१९४३ : दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्बहल्ल्यात ४२,००० नागरिक ठार झाले.
१९३४ : पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.
१९३३ : अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९३३ : सोविएत युनियन आणि स्पेनमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१८२१ : पेरु या देशाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५४ : ह्युगो चावेझ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ मार्च २०१३)
१९३६ : सर गारफिल्ड तथा ’गॅरी’ सोबर्स – वेस्ट इंडिजचे क्रिकेट कर्णधार, फलंदाज, डावखुरे लेगब्रेक गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक
१९०७ : अर्ल टपर – ’टपरवेअर’चा संशोधक (मृत्यू: ५ आक्टोबर १९८३)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९८८ : राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनौ येथील के. डी. सिंगबाबू स्टेडियम जवळ हत्या (जन्म: ? ? १९६२)
१९८१ : बाबूराव गोखले – नाटककार व भावगीतकार (जन्म: १९ सप्टेंबर १९२५)
१९७७ : गोविंद परशुराम तथा ’पंडितराव’ नगरकर – गायक व अभिनेते, ’अमर भूपाळी’ चित्रपटातील होनाजी बाळा यांची ’घनश्याम सुंदरा’ ही भूपाळी गाऊन अजरामर झालेले गायक (जन्म: ? ? ????)
१९७५ : राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर – चित्रपट दिग्दर्शक (बोलविता धनी, मी तुळस तुझ्या अंगणी, माझं घर माझी माणसं, घरचं झालं थोडं, गजगौरी, जख्मी) (जन्म: २६ नोव्हेंबर १९२३ - फोंडा, गोवा)
१९६८ : ऑटो हान – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ८ मार्च १८७९)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Sunday, 1 December, 2013 18:14