हा या वर्षातील १२८ वा (लीप वर्षातील १२९ वा) दिवस आहे.

जगातील अनेक देशांत ’रेड क्रॉस’ या सेवाभावी संस्थेचे कार्य चालते. मात्र जवळपास सर्व मुस्लिम देशांत ’रेड क्रॉस’ या संस्थेला ’रेड क्रिसेंट’ म्हणतात. कारण तेथील मुस्लिमांना ’रेड क्रॉस’ या नावातील ’क्रॉस’ हा शब्द चालत नाही. रेड क्रॉस

महत्त्वाच्या घटना:

१९७४ : रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.
१९४५ : दुसरे महायुद्ध – युरोप विजय दिन - जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती, युरोपमधील युद्ध समाप्त
१९३३ : महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.
१९३२ : पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे येथे गांधर्व महाविद्यालय सुरू केले. या महाविद्यालयाची स्थापना लाहोर येथे ५ मे १९०१ रोजी पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी केली होती.
१९१२ : ’पॅरामाउंट पिक्चर्स’ (Paramount Pictures) या कंपनीची स्थापना झाली.
१८९९ : क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी
१८८६ : जॉन पेंबरटनने ’कोका कोला’ हे पेय पहिल्यांदाच तयार करुन विकले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७० : मायकेल बेव्हन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू
१९१६ : स्वामी चिन्मयानंद सरस्वती – अध्यात्मिक गुरू (मृत्यू: ३ ऑगस्ट १९९३)
१८८४ : हॅरी एस. ट्रूमन – अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २ डिसेंबर १९७२)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१३ : झिया फरिदुद्दीन डागर – धृपद गायक (जन्म: १५ जून १९३२)
२००३ : डॉ. अमृत माधव घाटगे – संस्कृत व प्राकृत विद्वान (जन्म: १० ऑगस्ट १९१३)
१९९९ : श्रीकृष्ण समेळ – कलादिग्दर्शक
१९९५ : प्रेम भाटिया – पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी (जन्म: ११ ऑगस्ट १९११)
१९९५ : जि. भी. दीक्षित – देवदेवतांची आणि संतांची चित्रे यामुळे प्रसिद्ध असलेले चित्रकार
१९८२ : आत्माराम रावजी देशपांडे तथा 'कवी अनिल’ – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, साहित्य संमेलनाचे व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, ’प्रेम आणि जीवन’, ’ भग्नमूर्ती’, ’चिनी मुलास’, ’निर्वासित’ ही खंडकाव्ये प्रसिद्ध आहेत. प्रौढ शिक्षणविषयक कार्यासाठी त्यांना नेहरू पारितोषिक मिळाले होते. (जन्म: ११ सप्टेंबर १९०१)
१९८१ : डॉ. केशव नारायण वाटवे – संस्कृतज्ञ, मराठी कवी. रसविमर्श, संस्कृत काव्याचे पंचप्राण, पाच मराठी कवी, संस्कृत सुबोधिनी (भाग १ ते ३), संस्कृत मुक्तहार (भाग १ ते ३) इ. पुस्तके त्यांनी लिहिली. (जन्म: ? ? ????)
१७९४ : अ‍ॅन्टॉइन लॅव्हाझिये – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ, आधुनिक रसायनशास्त्राचा जनक याला देशद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल देहदंड देण्यात आला. (जन्म: २६ ऑगस्ट १७४३)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 28 February, 2014 15:36