हा या वर्षातील २४४ वा (लीप वर्षातील २४५ वा) दिवस आहे.

       दुसरे महायुद्ध १९३९ ते १९४५ अशी सहा वर्षे चालले. त्यात मारल्या गेलेल्या सैनिक व नागरिकांची संख्या होती तब्बल साडे पाच कोटी. त्यात एकट्या रशियाचेच १ कोटी ३६ लाख सैनिक व ७७ लाख नागरिक मारले गेले!

महत्त्वाच्या घटना:

१९९१ : उझबेकिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
१९७२ : आइसलँडमधील रिकजेविक येथे अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केले व जगज्जेता बनला.
१९६९ : लिबीयात उठाव होऊन हुकूमशहा मुअम्मर गडाफी सतेवर आला.
१९५६ : भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना झाली.
१९५१ : अर्नेस्ट हेमिंग्वे यांची ’द ओल्ड मॅन अ‍ॅन्ड द सी’ ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलित्झर पुरस्कार मिळाले.
१९३९ : जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसर्‍या महायुद्धाची सुरुवात झाली.
१९१४ : रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड करण्यात आले.
१९११ : पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४९ : पी. ए. संगमा – लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री
१९२१ : माधव मंत्री – यष्टीरक्षक व उजव्या हाताचे फलंदाज
१९१५ : राजिंदरसिंग बेदी – ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक. साहित्य अकादमी पुरस्कार (१९६५), पद्मश्री (१९७२). ’दस्तक’ या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन व दिग्दर्शन त्यांचे असून या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. (मृत्यू: ? ? १९८४)
१९०८ : कृष्ण नारायण तथा के. एन. सिंग – हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक (मृत्यू: ३१ जानेवारी २०००)
१८९६ : अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद – हरेकृष्ण पंथाचे संस्थापक (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००८ : थॉमस जे. बाटा – बाटा शू कंपनीचे संस्थापक (जन्म: १७ सप्टेंबर १९१४)
१८९३ : काशिनाथ त्र्यंबक तेलंग – प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस (१८८५-१८८९), मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (१८९२), हिंदू कायद्यात सुधारणा होण्यासाठी त्यांनी प्रयत्‍न केले. भगवद्‌गीतेचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला. (जन्म: ३० ऑगस्ट १८५०)
१७१५ : सलग ७२ वर्षे राज्यकारभार केल्यानंतर फ्रान्सचा राजा १४ वा लुई मरण पावला. त्याचा राज्यकाल कोणत्याही युरोपीय राज्यकर्त्यापेक्षा जास्त होता. (जन्म: ५ सप्टेंबर १६३८)
१५८१ : गुरू राम दास – शिखांचे चौथे गुरू (जन्म: २४ सप्टेंबर १५३४)
१५७४ : गुरू अमर दास – शिखांचे तिसरे गुरू (जन्म: ५ मे १४७९)


Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Tuesday, 18 February, 2014 21:37