हा या वर्षातील १३५ वा (लीप वर्षातील १३६ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००० : दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू - काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ जण ठार
१९६१ : पुण्याच्या चतु:शृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू
१९४० : दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९४० : सॅन बर्नाडिनो, कॅलिफोर्निया येथे ’मॅक्डोनाल्डस’ (McDonald's) चे पहिले उपहारगृह सुरू झाले.
१९३५ : मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
१८३६ : सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणार्‍या ’बेलीज बीड्‌स’चे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले.
१८११ : पॅराग्वेला (स्पेनकडून) स्वातंत्र्य मिळाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६७ : माधुरी दिक्षीत-नेने – अभिनेत्री
???? : डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर – शास्त्रज्ञ व लेखक
१९०७ : ’सुखदेव’ थापर – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१)
१९०३ : रा. श्री. जोग – साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७७)
१८५९ : पिअर क्युरी – नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १९ एप्रिल १९०६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००० : सज्जन – जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते. तलाक (१९५८), बीस साल बाद (१९६२) (जन्म: ? ? ????)
१९९४ : ओम अग्रवाल – जागतिक हौशी स्‍नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता (जन्म: ? ? ????)
१९९४ : पी. सरदार – चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू (जन्म: ? ? ????)
१९९३ : फील्डमार्शल के. एम. करिअप्पा – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख (जन्म: २८ जानेवारी १८९९)
१७२९ : वैशाख व. १४, शके १६५१ मराठेशाहीच्या आपत्‌प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन. दाभाडे घराण्याला सातशे गावांची देशमुखी असल्यामुळे त्यांना वतनदारांचे मुकुटमणी म्हणत. (जन्म: ? ? ????)
१३५० : संत जनाबाई (जन्म: ? ? १२९८)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Sunday, 18 January, 2015 0:36