हा या वर्षातील २९८ वा (लीप वर्षातील २९९ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००९ : बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.
१९९९ : दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे ’बूकर पारितोषिक’ दुसर्‍यांदा मिळाले.
१९९४ : ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६२ : युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९५१ : स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली. हिमाचल प्रदेशातील चिन्नी येथे पहिले मतदान झाले. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी या निवडणूकांचा शेवटचा टप्पा पार पडला. या निवडणुकीत ४५.७% मतदान झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४५ : अपर्णा सेन – अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका
१९३७ : डॉ. अशोक रानडे – संगीत समीक्षक (मृत्यू: ३० जुलै २०११)
१८८१ : पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार (मृत्यू: ८ एप्रिल १९७३)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२ : जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते (जन्म: ३ मार्च १९५५)
२००९ : चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (जन्म: १४ जानेवारी १९२३)
२००३ : पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. न्याय, वेदांत व्याकरण आदि शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला. अवघ्या वीस सहकार्‍यांना बरोबर घेऊन त्यांनी ’स्वाध्याय परिवार’ सुरू केला. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ’मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. (जन्म: १९ आक्टोबर १९२०)
१९८० : अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार (जन्म: ८ मार्च १९२१)
१९५५ : पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर – शास्त्रीय गायक, ’पायोजी मैने रामरतन धन पायो’, ’ठुमक चलत रामचंद्र’, ’चलो मन गंगा जमुनातीर’ ही त्यांनी गायलेली काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत. ’सुध मुद्रा, सुध बानी’ हे गायकासंबंधी सांगितलेले कलागुण त्यांच्यात प्रकर्षाने दिसत असत. गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे ते वडील होत. (जन्म: २८ मे १९२१)
१६४७ : इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक (जन्म: १५ आक्टोबर १६०८)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Saturday, 25 October, 2014 11:52