हा या वर्षातील १७५ वा (लीप वर्षातील १७६ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००१ : ’आय. एन. एस. विराट’ ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकीकरणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.
१९९८ : अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा 'चित्रभूषण पुरस्कार' जाहीर
१९८२ : कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड भाषा शिकविण्याची सक्ती करण्यात आली.
१९४० : दुसरे महायुद्ध – फ्रान्स व इटलीमधे शस्त्रसंधी झाली.
१९३९ : सयामचे थायलँड असे नामकरण करण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९२८ : मृणाल गोरे – समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य (मृत्यू: १७ जुलै २०१२)
१९०८ : गुरू गोपीनाथ – कथकली नर्तक (मृत्यू: ९ आक्टोबर १९८७)
१८९९ : मर्दानी रुप, तिन्ही सप्तकांतुन सहजपणे फिरणारा आवाज या देणग्या लाभलेले व गंधर्वयुगाची स्मृती जागवणारे नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक यांचा जन्म (मृत्यू: ८ एप्रिल १९७४)
१८९७ : पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ ’प्रणव रंग’ – गायक व संगीत अभ्यासक, १९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (मृत्यू: २९ डिसेंबर १९६७)
१८६९ : दामोदर हरी चाफेकर – चार्ल्स रँड याची हत्या करणारे (मृत्यू: १८ एप्रिल १८९८)
१८६२ : श्रीधर बाळकृष्ण रानडे – रविकिरण मंडळाचे संस्थापक (मृत्यू: २१ मार्च १९७४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९७ : संयुक्ता पाणिग्रही – ओडीसी नर्तिका (जन्म: २४ ऑगस्ट १९४४)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Saturday, 11 January, 2014 16:33