हा या वर्षातील २०८ वा (लीप वर्षातील २०९ वा) दिवस आहे.
महत्त्वाच्या घटना:
२०१२ |
: |
लंडन येथे ३० व्या येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. |
२००१ |
: |
सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, सार्वजनिक वाहने या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवनावर व थुंकण्यावर तसेच या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा निर्णय |
१९९९ |
: |
द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलिअम मंत्रालयाने मंजूर केला. |
१९९७ |
: |
तामिळनाडुचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे. |
१९८३ |
: |
कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली. |
१९५५ |
: |
दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले. |
१९२१ |
: |
रक्तातील साखरेवर ’इन्सुलिन’ या संप्रेरकाचे नियंत्रण असते असे टोरांटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी सिद्ध केले. तसेच त्यांनी ’इन्सुलिन’ शुद्ध स्वरुपात विभक्त करण्यात यश मिळवले. |
१८९० |
: |
डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडुन घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले. |
१७६१ |
: |
माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४ थे पेशवे बनले. |
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१९५५ |
: |
अॅलन बॉर्डर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू |
१९११ |
: |
डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ, पद्मभूषण (१९७१) (मृत्यू: २८ जानेवारी १९९७) |
१६६७ |
: |
योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (मृत्यू: १ जानेवारी १७४८) |
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
२००७ |
: |
वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ (जन्म: ३० जानेवारी १९१७) |
२००२ |
: |
कृष्णकांत – भारताचे १० वे उपराष्ट्रपती (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७) |
१९९७ |
: |
बळवंत लक्ष्मण वष्ट – हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते |
१९९२ |
: |
अमजद खान – हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक (जन्म: १२ नोव्हेंबर १९४० - गझनी, अफगाणिस्तान) |
१९८७ |
: |
डॉ. सलीम अली – जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक (जन्म: १२ नोव्हेंबर १८९६) |
१९८० |
: |
मोहम्मद रझा पेहलवी – शाह ऑफ इराण (जन्म: २६ आक्टोबर १९१९) |
१९७५ |
: |
त्र्यं. र. ऊर्फ मामासाहेब देवगिरीकर – गांधीवादी नेते, खासदार. भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर करुन २६ जानेवारी १९५० रोजीच ते वाचकांच्या हातात देण्याचे काम त्यांनी केले. (जन्म: ? ? ????) |
१८९५ |
: |
उस्ताद बंदे अली खाँ – बीनकार, किराणा घराण्याचे प्रवर्तक, सूक्ष्म स्वरांचे भान असणारे व मधुर वादन करणारे असा त्यांचा लौकिक होता. पुण्यात नव्या पुलाजवळील दर्ग्याच्या परिसरात उस्ताद बंदे अली खाँ यांची कबर आहे. (जन्म: ? ? ????) |
१८४४ |
: |
जॉन डाल्टन – इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ६ सप्टेंबर १७६६) |