-: दिनविशेष :-

२८ फेब्रुवारी

राष्ट्रीय विज्ञान दिन


महत्त्वाच्या घटना:

१९३५

वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.

१९२८

डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील एका परिणामाचा शोध लावला. त्याला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणुन साजरा करण्यात येतो.

१९२२

इजिप्तला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१८४९

अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५१

करसन घावरी – भारतीय क्रिकेटपटू

१९४८

विदुषी पद्मा तळवलकर – ग्वाल्हेर/किराणा/जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका

१९४४

रविन्द्र जैन – संगीतकार व गीतकार

१९४२

ब्रायन जोन्स – ‘द रोलिंग स्टोन्स’चे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक
(मृत्यू: ३ जुलै १९६९)

१९२७

कृष्णकांत – भारताचे १० वे उपराष्ट्रपती
(मृत्यू: २७ जुलै २००२)

१९०१

लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते [१९५४ - रसायनशास्त्र, १९६२ - शांतता]
(मृत्यू: १९ ऑगस्ट १९९४)

१८९७

डॉ. शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक. पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (१९५५) ते अध्यक्ष होते.
(मृत्यू: २३ ऑगस्ट १९७४)

१८७३

सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या ‘सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष. क्लेमंट अ‍ॅटली हे देखील या आयोगाचे एक सदस्य होते, जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले.
(मृत्यू: ११ जानेवारी १९५४)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९९

भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी – औध संस्थानचे राजे
(जन्म: ? ? ????)

१९९८

राजा गोसावी – अभिनेता
(जन्म: २८ मार्च १९२५)

१९९५

कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव – ‘सासरमाहेर’, ‘भाऊबीज’, ‘चाळ माझ्या पायांत’ या चित्रपटांचे त्यांनी कथा, संवाद व गीतलेखन केले होते.
(जन्म: १२ एप्रिल १९१४)

१९८६

स्वीडनचे २६ वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांची हत्या
(जन्म: ३० जानेवारी १९२७)

१९६६

उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार. त्यांनी पंजाब विद्यापीठातून ‘शास्त्री’ आणि कलकत्ता विद्यापीठातून ‘काव्यतीर्थ’ या उपाध्या मिळवल्या.
(जन्म: ३ ऑगस्ट १८९८)

१९६३

डॉ. राजेन्द्र प्रसाद – भारताचे पहिले राष्ट्रपती
(जन्म: ३ डिसेंबर १८८४)

१९३६

कमला नेहरू – पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी
(जन्म: १ ऑगस्ट १८९९)

१९२६

स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद – लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले, त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही. कविता मात्र बालपणापासून करीत होते. स्वातंत्रवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली.
(जन्म: ९ फेब्रुवारी १८७४ - नाशिक)



Pageviews

This page was last modified on 21 August 2021 at 11:31pm