हा या वर्षातील २९९वा (लीप वर्षातील ३०० वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९९ : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे ’स्वर्णजयंती फेलोशिप’ जाहीर
१९९४ : जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
१९६२ : धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मास्टर दत्ताराम दिग्दर्शित ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
१९०५ : नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७४ : रवीना टंडन – अभिनेत्री
१९४७ : हिलरी क्लिंटन – अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री
१९३७ : हृदयनाथ मंगेशकर – संगीतकार व गायक
१९१९ : मोहम्मद रझा पेहलवी - शाह ऑफ इराण (मृत्यू: २७ जुलै १९८०)
१९१६ : फ्रान्सवाँ मित्राँ – फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ८ जानेवारी १९९६)
१९०० : इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (मृत्यू: ७ मार्च १९९३)
१८९१ : वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक (मृत्यू: २७ आक्टोबर १९६४)
१२७० : संत नामदेव (मृत्यू: ३ जुलै १३५०)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९१ : अनंत काशिनाथ भालेराव – स्वातंत्र्यसैनिक, लेखक,  दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक, हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग (जन्म: १४ नोव्हेंबर १९१९)
१९७९ : चंदूलाल नगीनदास वकील – अर्थशास्त्रज्ञ, देशातील पहिल्या अर्थशास्त्र विभागाची त्यांनी मुंबई विद्यापीठात सुरुवात केली. (जन्म: ? ? ????)
१९३० : डॉ. वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म: १५ मार्च १८६०)
१९०९ : इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान (जन्म: १६ आक्टोबर १८४१)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 31 January, 2014 13:49