हा या वर्षातील ३३० वा (लीप वर्षातील ३३१ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००८ : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना ’लष्कर-ए-तैय्यबा’ने मुंबईत ठिकठिकाणी अतिरेकी हल्ले केले.
१९९९ : विकीरण जीवशास्त्र (Radiation Biology) या विषयात महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणार्‍या पुरस्कारासाठी डॉ. रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.
१९९७ : अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि पंतप्रधानांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर
१९६५ : अ‍ॅस्टॅरिक्स (A-1) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.
१९४९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७२ : अर्जुन रामपाल – अभिनेता
१९५४ : वेल्लुपल्ली प्रभाकरन – एल. टी. टी. ई. चा संस्थापक (मृत्यू: १८ मे २००९)
१९३९ : टीना टर्नर – अमेरिकन/स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका
१९२३ : राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर – चित्रपट दिग्दर्शक (बोलविता धनी, मी तुळस तुझ्या अंगणी, माझं घर माझी माणसं, घरचं झालं थोडं, गजगौरी, जख्मी) (मृत्यू: २८ जुलै १९७५ - मुंबई)
१९२१ : व्हर्गिस कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील ’धवल क्रांती’चे जनक, ’अमूल’चे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२ - नडियाद, गुजराथ)
१८९० : सुनीतिकुमार चटर्जी – आधुनिक ऐतिहासिक भाषाशास्त्र व ध्वनीविचार यांच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवणारे भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक (मृत्यू: २९ मे १९७७)
१८८५ : देवेन्द्र मोहन बोस – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २ जून १९७५)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००८ : हेमंत करकरे, अशोक कामठे, विजय सालसकर, तुकाराम ओंबाळे – मुंबई पोलिस दलातील अधिकारी
२००१ : चंद्रकांत कृष्णाजी जगताप – शिल्पकार, पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधींचा पुतळा, शनिवारवाड्यासमोरील सिंहाची प्रतिमा, सिंहगडावरील तानाजी मालुसरेंचा पुतळा ही त्यांनी घडवलेली काही प्रसिद्ध शिल्पे आहेते. याशिवाय त्यांनी तयार केलेली देवदेवतांची अनेक शिल्पे महाराष्ट्रात आहेत. (जन्म: ? ? ????)
१९९९ : दत्तात्रय शंकर जमदग्नी – पुण्यातील जनता सहकारी बँकेचे संस्थापक संचालक (जन्म: ? ? ????)
१९९४ : भालजी पेंढारकर – मराठी चित्रपटसृष्टी आणि समाजमनावर पाच तपे अधिराज्य गाजवणारे चित्रमहर्षी (जन्म: २ मे १८९९)
१९८५ : ’राजकवी’ यशवंत दिनकर पेंढारकर तथा कवी यशवंत – रविकिरण मंडळातील एक कवी, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांना ’महाराष्ट्र कवी’ म्हणून गौरविण्यात आले. (जन्म: ९ मार्च १८९९)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 27 February, 2014 18:45