-: दिनविशेष :-

११ मार्चEnroll for Standard 10 : Online Class

महत्त्वाच्या घटना:

२०११

जपानच्या मियागी प्रांतातील सेंडाई शहराच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

२००१

बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले. या आधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते.

२००१

कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारा हरभजनसिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.

१९९३

उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कार प्रदान.

१८१८

इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला.


Enroll for Standard 10 : Online Class

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८५

अजंता मेंडिस – श्रीलंकेचा गोलंदाज

१९४०

दया डोंगरे – रंगभूमी, चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील कसलेली अभिनेत्री. ‘तुझी माझी जोडी जमली रे’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘याचसाठी केला होता अट्टहास’, ‘इडा पिडा टळो’ ‘रंभा’, ‘संकेत मिलनाचा’ इ. नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. मात्र ‘लेकुरे उदंड झाली’ या नाटकाने दया डोंगरे यांचा चाहता वर्ग वाढला आणि त्यांना खर्‍या अर्थाने कलाकार म्हणून ओळख मिळाली.

१९१६

हॅरॉल्ड विल्सन – इंग्लंडचे पंतप्रधान
(मृत्यू: २४ मे १९९५)

१९१५

विजय हजारे – क्रिकेटपटू
(मृत्यू: १८ डिसेंबर २००४)

१९१२

प्रा. शंकर गोविंद साठे – कवी, कथालेखक आणि नाटककार. त्यांच्या ‘ससा आणि कासव’ या नाटकावरून सई परांजपे यांनी ‘कथा’ या नावाचा चित्रपट काढला होता.

(मृत्यू: २६ डिसेंबर २०००)


Enroll for Standard 10 : Online Class

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००६

स्लोबोदान मिलोसोव्हिच – सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष
(जन्म: २० ऑगस्ट १९४१)

१९९३

शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते, (संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस) त्यांनी [जन्माने ख्रिश्चन असूनही] २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली
(जन्म: २५ एप्रिल १९१८ - अहमदनगर)

१९७०

अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील
(जन्म: १७ जुलै १८८९)

१९६५

गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ‘धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ’सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे. १२ डिसेंबर १८९२)

१९५५

अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ
(जन्म: ६ ऑगस्ट १८८१)

१६८९

छत्रपती संभाजी महाराज
(जन्म: १४ मे १६५७)


Pageviews

This page was last modified on 07 May 2021 at 7:49pm