-: दिनविशेष :-

१८ डिसेंबर

अस्पृश्यता निवारण दिन

अल्पसंख्याक हक्क दिन

International Migrants Day

महत्त्वाच्या घटना:

२००६

संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.

१९९५

अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्‍नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.

१९८९

सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९७८

डॉमिनिकाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९३५

श्रीलंकेत ‘लंका सम समाज पार्टी’ची स्थापना

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७१

बरखा दत्त
At the World Economic Forum (2010)

बरखा दत्त – पत्रकार

(Image Credit: Wikipedia)

१९७१

अरांताक्सा सँचेझ व्हिकारिओ

अरांताक्सा सँचेझ व्हिकारिओ – स्पॅनिश लॉन टेनिस खेळाडू, १४ वेळा ग्रँड स्लॅम विजेती (४ एकेरी, ६ महिला दुहेरी आणि ४ मिश्र दुहेरी), ४ ऑलिम्पिक पदके विजेती

(Image Credit:  Tennis Hall of Fame)

१९६३

ब्रॅड पिट

विल्यम ब्रॅडले पिट उर्फ ब्रॅड पिट – अमेरिकन अभिनेता व निर्माता

(Image Credit: Wikipedia)

१९५५

विजय मल्ल्या
२००८ मधील छायाचित्र

विजय मल्ल्या – फरारी करण्यात आलेला भारतीय उद्योगपती, २ वेळा राज्यसभा खासदार (२००२ - २००९ आणि २०१० - २०१६)

१८९०

ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक
(मृत्यू: ३१ जानेवारी १९५४)

१८८७

भिखारी ठाकूर

भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ‘शेक्सपिअर’. कवी, नाटककार, संगीतकार, दार्शनिक, समाज सुधारक, गायक, नर्तक, अभिनेता व लोककलाकार
(मृत्यू: १० जुलै १९७१)

(Image Credit: Wikipedia)

१८७८

जोसेफ स्टालिन

जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: ५ मार्च १९५३)

(Image Credit: britannica.com)

१८५६

जे. जे. थॉमसन

सर जे. जे. थॉमसन – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: ३० ऑगस्ट १९४०)

(Image Credit: THE NOBEL PRIZE)

१६२०

हेन्‍रिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक
(मृत्यू: २० जून १६६८)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००४

विजय हजारे – क्रिकेटपटू
(जन्म: ११ मार्च १९१५)

२०००

मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी – इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक
(जन्म: ? ? ????)

१९९५

कमलाकरबुवा औरंगाबादकर – राष्ट्रीय कीर्तनकार
(जन्म: ? ? ????)

१९९३

राजा बारगीर – चित्रपट दिग्दर्शक. ‘सुखाचे सोबती’ (१९५८), ‘बोलकी बाहुली’ (१९६१), ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’ (१९६७), ‘मानाचा मुजरा’ (१९६९), ‘करावं तसं भरावं’ (१९७५), ‘दीड शहाणे’ (१९७९), ‘ठकास महाठक’ (१९८४), ‘गडबड घोटाळा’ (१९८६), ‘तुझी माझी जमली जोडी’ (१९९०) अशा सुमारे नव्वद मराठी व हिन्दी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले.
(जन्म: ? ? ????)

१९८०

अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान
(जन्म: २० फेब्रुवारी १९०४)

१८२९

जीन बाप्टिस्टे लॅमार्क – फ्रेंच शास्त्रज्ञ
(जन्म: १ ऑगस्ट १७४४)



Pageviews

This page was last modified on 17 December 2021 at 11:24pm