-: दिनविशेष :-

२० फेब्रुवारी

जागतिक सामाजिक न्याय दिवस


महत्त्वाच्या घटना:

२०१४

बर्‍याच गदारोळानंतर राज्यसभेतही आंध्र प्रदेशच्या विभाजनाचे विधेयक संमत झाल्याने ‘तेलंगण’ हे भारताचे २९ वे राज्य बनले.

१९८७

मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले.

१९७८

शेवटचा ‘ऑर्डर ऑफ व्हिक्टरी’ सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.

१७९२

राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी टपाल सेवा कायद्यावर सही केल्यामुळे अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५१

गॉर्डन ब्राऊन – इंग्लंडचे पंतप्रधान

१९०४

अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान
(मृत्यू: १८ डिसेंबर १९८०)

१८४४

लुडविग बोल्टझमन
व्हिएन्ना विद्यापीठातील बोल्टझमन याचा अर्धपुतळा

लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: ५ सप्टेंबर १९०६)

(Image Credit: Wikipedia)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२

डॉ. रत्‍नाकर मंचरकर

डॉ. रत्‍नाकर बापूराव मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक
(जन्म: ६ आक्टोबर १९४३)

(Image Credit: विवेक: महाराष्ट्र नायक)

२००१

इंद्रजित गुप्ता – केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते
(जन्म: १८ मार्च १९१९)

१९९७

श्री. ग. माजगावकर – पत्रकार, ’माणूस’ साप्ताहिकाचे संपादक
(जन्म: ? ? ????)

१९९४

त्र्यं. कृ. टोपे – घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू
(जन्म: ? ? ????)

१९७४

के. नारायण काळे – नाट्यसमीक्षक
(जन्म: ? ? ????)

१९५०

बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू
(जन्म: ६ सप्टेंबर १८८९)

१९१०

ब्युट्रोस घाली – इजिप्तचे पंतप्रधान
(जन्म: ? ? १८४६)

१९०५

विष्णुपंत छत्रे – भारतातील सर्कस उद्योगाचे जनक
(जन्म: ? ? १८४६)Pageviews

This page was last modified on 05 October 2021 at 10:08pm