हा या वर्षातील २३१ वा (लीप वर्षातील २३२ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९९ : बेलग्रेड, युगोस्लाव्हिया येथे हजारो सर्बियन लोकांनी राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले.
१९४५ : हो ची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.
१९१९ : अफगाणिस्तानला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९०९ : इंडियानापॉलिस मोटर स्पीडवे येथे मोटारींची पहिली शर्यत झाली.
१८५६ : गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट मिळाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४६ : बिल क्लिंटन – अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष
१९१८ : शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती (मृत्यू: २६ डिसेंबर १९९९)
१९०७ : सरदार स्वर्ण सिंग – केन्द्रीय मंत्री (मृत्यू: ३० आक्टोबर १९९४)
१९०३ : गंगाधर देवराव खानोलकर – लेखक व चरित्रकार, ‘अर्वाचीन मराठी वाड़्‍मय सेवक’ या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले. (मृत्यू: ३० सप्टेंबर १९९२)
१८८६ : मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील (मृत्यू: २ जानेवारी १९३५)
१८७१ : ऑर्व्हिल राईट – आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (मृत्यू: ३० जानेवारी १९४८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९४ : लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते [१९५४ - रसायनशास्त्र, १९६२ - शांतता] (जन्म: २८ फेब्रुवारी १९०१)
१९९३ : य. द. लोकुरकर – निर्भिड पत्रकार (जन्म: ? ? ????)
१९९३ : उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारे कलाकार (जन्म: २९ मार्च १९२९)
१९९० : रा. के. लेले – पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक (जन्म: ????)
१९७५ : डॉ. विनायक विश्वनाथ तथा ’अप्पासाहेब’ पेंडसे – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ’ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (जन्म: १७ ऑगस्ट १९१६)
१९४७ : विनायक दामोदर कर्नाटकी ऊर्फ ’मास्टर विनायक’ – अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते. त्यांनी २२ चित्रपटातून भूमिका केल्या तर २९ चित्रपट दिग्दर्शित केले. (जन्म: १९ जानेवारी १९०६)
१६६२ : ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (जन्म: १९ जून १६२३)


Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 2 May, 2014 14:48