हा या वर्षातील ८८ वा (लीप वर्षातील ८९ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९८२ : एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.
१९७३ : व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.
१९६८ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना
१९३० : ’प्रभात’चा ’खूनी खंजिर’ हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
१८५७ : बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. या घटनेतुनच १८५७ च्या राष्ट्रीय उठावाची सुरूवात झाली.
१८४९ : ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४८ : नागनाथ कोतापल्ले – साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
१९४३ : जॉन मेजर – इंग्लंडचे पंतप्रधान
१९३० : अनिरुद्ध जगन्नाथ – मॉरिशसचे पंतप्रधान
१९२९ : उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारे कलाकार (मृत्यू: १९ ऑगस्ट १९९३)
१९२६ : पांडुरंग लक्ष्मण तथा ’बाळ’ गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक (मृत्यू: २१ मार्च २०१०)
१८६९ : सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (मृत्यू: १ जानेवारी १९४४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९७ : पुपुल जयकर – सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या (जन्म: ११ सप्टेंबर १९१५)
१९७१ : धीरेंद्रनाथ दत्ता – बांगलादेशी राजकारणी (जन्म: २ नोव्हेंबर १८८६)
१९६४ : शंकर नारायण तथा ’वत्स’ जोशी – इतिहाससंशोधक (जन्म: ? ? ????)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Saturday, 11 January, 2014 13:27