-: दिनविशेष :-

२ जून

इटलीचा प्रजासत्ताक दिवस


महत्त्वाच्या घटना:

२०००

लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयाचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर

१९९९

भूतानमधे दूरचित्रवाणी प्रसारण सुरू झाले.

१९७९

पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.

१९५३

इंग्लंडची राणी दुसरी एलिझाबेथ हिचा राज्यारोहण समारंभ झाला. इंग्लंडच्या राष्ट्रप्रमुखाचा राज्यारोहण समारंभ प्रथमच दूरचित्रवाणीद्वारे जगभर पाहिला गेला.

१९४९

दक्षिण अफ्रिकेने श्वेतवर्णीय सोडुन इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.

१८९७

आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेनने न्यूर्यॉक टाईम्सला सांगितले -

माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे!

१८९६

गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी ‘रेडिओ’चे पेटंट घेतले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७४

गाटा काम्स्की – अमेरिकन बुद्धीबळपटू

१९६५

मार्क वॉ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू

१९६५

स्टीव्ह वॉ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू

१९६३

आनंद अभ्यंकर – अभिनेते
(मृत्यू: २३ डिसेंबर २०१२)

१९५६

मणीरत्‍नम – चित्रपट दिग्दर्शक

१९५५

नंदन नीलेकणी – ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक

१९४३

इलियाराजा – गायक, गीतकार, वादक, संगीतसंयोजक आणि संगीतकार

१८४०

थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी
(मृत्यू: ११ जानेवारी १९२८)

१७३१

मार्था वॉशिंग्टन – अमेरिकेची पहिली ‘फर्स्ट लेडी’
(मृत्यू: २२ मे १८०२)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९२

डॉ. गुंथर सोन्थायमर – महाराष्ट्र लोकधर्म व मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक
(जन्म: २१ एप्रिल १९३४)

१९९०

सर रेक्स हॅरिसन – ब्रिटिश तसेच अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते. त्यांनी ‘शालीमार’ या एका हिंदी चित्रपटातही भूमिका केली होती.
(जन्म: ५ मार्च १९०८)

१९८८

राज कपूर – अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आणि ‘द ग्रेटेस्ट शो मॅन’
(जन्म: १४ डिसेंबर १९२४)

१९७५

देवेन्द्र मोहन बोस – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक
(जन्म: २६ नोव्हेंबर १८८५)

१८८२

जुसेप्पे गॅरीबाल्डी – इटालियन सेनापती व राजकीय नेता
(जन्म: ४ जुलै १८०७)


Pageviews

This page was last modified on 03 May 2021 at 7:31pm