-: दिनविशेष :-

२९ फेब्रुवारी

लीप दिवस

  • ज्या वर्षाला ४ ने पूर्ण भाग जातो अशा वर्षात लीप दिवस येतो. उदा: २०१२
  • याला एक अपवाद आहे. ज्या शतकी वर्षांना ४०० ने पूर्ण भाग जातो अशा वर्षातच हा दिवस येतो. उदा: २१००, २२००, २३०० ही लीप वर्षे नसतील पण २४०० हे लीप वर्ष असेल.
  • टास्मानियाचे पंतप्रधान सर जेम्स विल्सन हे २९ फेब्रुवारी रोजी जन्मलेले व मृत्यू पावलेले एकमेव प्रसिद्ध व्यक्ती होत.


महत्त्वाच्या घटना:

२०१२

६३४ मीटर उंचीच्या ‘टोकियो स्काय ट्री’ या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले.

२०००

शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला.

१९९६

क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४०

गोपीचंद हिंदुजा – उद्योगपती

१९०४

रुक्मिणीदेवी अरुंडेल – भरतनाट्यम नर्तिका
(मृत्यू: २४ फेब्रुवारी १९८६)

१८९६

मोरारजी देसाई – भारताचे ४ थे पंतप्रधान, स्वातंत्र्यसेनानी व गांधीवादी नेते, ‘भारतरत्‍न’
(मृत्यू: १० एप्रिल १९९५)

१८१२

सर जेम्स विल्सन – टास्मानियाचे पंतप्रधान
(मृत्यू: २९ फेब्रुवारी १८८०)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८८०

सर जेम्स विल्सन – टास्मानियाचे पंतप्रधान
(मृत्यू: २९ फेब्रुवारी १८१२)



Pageviews

This page was last modified on 22 August 2021 at 1:20pm