हा या वर्षातील १२२ वा (लीप वर्षातील १२३ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२०११ : अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अ‍ॅबोटाबाद येथे हत्या केली.
२००४ : एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९९ : कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने ५१.१ कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन ३ तास ५१ मिनिटांत पार केले.
१९९७ : टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान बनले.
१९९७ : राष्ट्रीय ’अ’ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कुंटेने ’इंटरनॅशनल मास्टर’ किताबासाठीचे निकष पूर्ण केले.
१९९४ : ’बँक ऑफ कराड’चे ’बँक ऑफ इंडिया’मधे विलिनीकरण झाले.
१९९४ : नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग ३७ तास ४५ मिनिटे पोहून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.
१९४५ : दुसरे महायुद्ध – सोविएत सैन्याने बर्लिनचा पाडाव केला.
१९२१ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातुन हिन्दुस्थानात पाठवणी
१९०८ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६९ : ब्रायन लारा – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू
१९२९ : जिग्मे दोरजी वांगचुक – भूतानचे राजे (मृत्यू: २१ जुलै १९७२)
१९२१ : सत्यजित रे – ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न. ’पथेर पांचाली’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला देशविदेशात अनेक गौरव मिळाले. त्यांना विशेष ऑस्कर पुरस्कारही देण्यात आला होता. (मृत्यू: २३ एप्रिल १९९२)
१९२० : डॉ. वसंतराव देशपांडे – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक (मृत्यू: ३० जुलै १९८३)
१८९९ : भालजी पेंढारकर – मराठी चित्रपटसृष्टी आणि समाजमनावर पाच तपे अधिराज्य गाजवणारे चित्रमहर्षी (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९९४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०११ : ओसामा बिन लादेन – 'अल कायदा'चा संस्थापक (जन्म: १० मार्च १९५७)
१९९९ : पं. सुधाकरबुवा डिग्रजकर – जयपूर-अत्रौली घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म: ? ? ????)
१९९८ : पुरुषोत्तम काकोडकर – गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५ व्या लोकसभेचे सदस्य (जन्म: १८ मे १९१३)
१९७५ : शांताराम आठवले – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार. ’भाग्यरेखा’, ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ वगैरे अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. ’संत तुकाराम’ चित्रपटातील ’आधी बीज एकले’ हा अभंग त्यांनी रचला आहे. परंतु लोकांना हा अभंग तुकारामांचाच आहे असे वाटते. (जन्म: २१ जानेवारी १९१०)
१९७३ : दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर – लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक (जन्म: ८ जून १९१०)
१९६३ : डॉ. के. बी. लेले – महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य (जन्म: २ नोव्हेंबर १८८२)
१६८३ : रघुनाथ नारायण हणमंते तथा रघुनाथपंडित – शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन ’राज्यव्यवहारकोश’ तयार करणारे मुत्सद्दी (जन्म: ? ? ????)
१५१९ : लिओनार्डो डा विंची – इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १५ एप्रिल १४५२)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Tuesday, 14 January, 2014 21:31