हा या वर्षातील ४५ वा दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००३ : नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के. बिर्लाफांउंडेशनतर्फे दिल्या जाणार्‍या सरस्वती सन्मानासाठी निवड
२००० : अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.
१९८९ : भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे यूनियन कार्बाईडने कबूल केले.
१९८९ : ईराणच्या आयातोल्ला खोमेनीने ब्रिटिश लेखक सलमान रश्दीच्या खूनाचा फतवा काढला.
१८८१ : भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना
१९६३ : अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.
१९४६ : पहिला संगणक 'एनियाक' युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.
१९४५ : दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्स च्या विमानांनी तुफानी बॉम्बफेक करुन जर्मनीतील ड्रेस्डेन शहर बेचिराख केले.
१९४५ : चिली, इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१८९९ : अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.
१८७६ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५० : कपिल सिबल – वकील आणि केंद्रीय मंत्री
१९३३ : मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – अभिनेत्री (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९६९ - मुंबई)
१९२५ : मोहन धारिया – केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: १४ आक्टोबर २०१३)
१९१६ : संजीवनी मराठे – कवयित्री (मृत्यू: १ एप्रिल २०००)
१९१४ : जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार (मृत्यू: ९ ऑगस्ट १९७६)
१४८३ : बाबर – पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक (मृत्यू: २६ डिसेंबर १५३०)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९७५ : पी. जी. वूडहाऊस – इंग्लिश लेखक (जन्म: १५ आक्टोबर १८८१)
१९७५ : ज्यूलियन हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (जन्म: २२ जून १८८७)
१९७४ : श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (जन्म: १ जानेवारी १९००)
१४०५ : तैमूरलंग – मंगोलियाचा राजा (जन्म: ८ एप्रिल १३३६)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Tuesday, 22 April, 2014 9:35