-: दिनविशेष :-

१५ फेब्रुवारी

जागतिक बालकर्करोग दिन

‘ऊर्दू’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या भाषेचे मूळ नाव होते ‘हिंदी’! अमीर खूस्रोने तिचा प्रथम हिंदी म्हणून उल्लेख केला होता. नंतर दिल्ली व लखनौ येथील विद्वानांनी इ. स. १७२५ च्या सुमारास तिला ‘ऊर्दू’ हे नाव दिले.
       ‘ऊर्दू’ हा मुळात तुर्की भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ ‘लष्करी छावणी’ असा आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९४२

दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.

१९३९

काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले. त्यातून पंडित नेहरुंसह कार्यकारिणीच्या बारा सभासदांनी राजीनामे दिले.

१८७९

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.

३९९

सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७९

हामिश मार्शल

हामिश मार्शल – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

(Image Credit: ESPN CricInfo)

१९५६

डेसमंड हेन्स

डेसमंड हेन्स – वेस्ट इंडिजचा (बार्बाडोस) क्रिकेटपटू

(Image Credit: sportskeeda.com)

१९४९

नामदेव लक्ष्मण ढसाळ – दलित साहित्यिक (मृत्यू: १५ जानेवारी २०१४)

१८२४

राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (१८८५), भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार
(मृत्यू: २६ जुलै १८९१)

१७१०

लुई (पंधरावा) – फ्रान्सचा राजा
(मृत्यू: १० मे १७७४)

१५६४

गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: ८ जानेवारी १६४२)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९८८

रिचर्ड फाइनमन – क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक (१९६५) मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक. २९ डिसेंबर १९५९ रोजी अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या कॅलटेक ( Caltech) येथे दिलेल्या There's Plenty of Room at the Bottom या भाषणात आजच्या अब्जांश तंत्रज्ञानाची (Nanotechnology ) बीजे रोवली गेली आहेत असे मानता येईल.
(जन्म: ११ मे १९१८)

१९८०

मनोहर दिवाण – कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय
(जन्म: ? ? ????)

१९८०

कॉंम्रेड एस. एस. मिरजकर – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष
(जन्म: ? ? ????)

१९५३

सुरेशबाबू माने – किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक
(जन्म: ? ? १९०२)

१९४८

सुभद्राकुमारी चौहान – हिन्दी कवयित्री
(जन्म: १६ ऑगस्ट १९०४)

१८६९

मिर्झा असदुल्ला बेग खान ग़ालिब ऊर्फ मिर्झा ग़ालिब – ऊर्दू शायर
(जन्म: २७ डिसेंबर १७९७)



Pageviews

This page was last modified on 10 May 2021 at 10:30pm