हा या वर्षातील ६१ वा (लीप वर्षातील ६२ वा) दिवस आहे.
महत्त्वाच्या घटना:
२००१ |
: |
मध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यास सुरूवात केली. |
१९६९ |
: |
फ्रेन्च बनावटीच्या ’कॉन्कॉर्ड’ या पहिल्या स्वनातीत (ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्या) विमानाचे यशस्वी उड्डाण |
१९७८ |
: |
स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली. |
१९७० |
: |
ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्होडेशिया प्रजासत्ताक बनले. |
१९५६ |
: |
मोरोक्कोला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले. |
१९५२ |
: |
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन |
१९४९ |
: |
न्यू मिलफोर्ड, कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वंयंचलित दिवे बसविण्यात आले. |
१९४६ |
: |
हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. |
१९०३ |
: |
’मार्था वॉशिंग्टन हॉटेल’ हे फक्त महिलांसाठी असलेले जगातील पहिले हॉटेल न्यूयॉर्क मधे सुरू झाले. |
१८५७ |
: |
जे. जे. स्कूल ऑफ आर्टस सुरू झाले |
१८५५ |
: |
अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला. |
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१९७७ |
: |
अँड्र्यू स्ट्रॉस – इंग्लिश क्रिकेटपटू |
१९३१ |
: |
राम शेवाळकर – मराठी साहित्यिक (मृत्यू: ३ मे २००९) |
१९३१ |
: |
मिखाईल गोर्बाचेव्ह – सोविएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते |
१९२५ |
: |
शांता जोग – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०) |
१७४२ |
: |
विश्वासराव – पानिपतच्या ३ र्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव (मृत्यू: १४ जानेवारी १७६१) |
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१९९४ |
: |
पं. श्रीपादशास्त्री जेरे – धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न (जन्म: ? ? ????) |
१९८६ |
: |
डॉ. काशिनाथ घाणेकर – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते (जन्म: १४ सप्टेंबर १९३२) |
१९४९ |
: |
सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी, रौलेट कायदा, मॉन्टेग्यू - चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (जन्म: १३ फेब्रुवारी १८७९) |
१९३० |
: |
डी. एच. लॉरेन्स – इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार (जन्म: ११ सप्टेंबर १८८५) |
१७०० |
: |
मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन (जन्म: २४ फेब्रुवारी १६७०) |
१५६८ |
: |
मीरा रत्नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई (जन्म: ? ? ????) |